Skip to content

स्वामी विवेकानंद यांची पूर्ण माहिती | swami vivikanad information in marathi

१२ जानेवारी , १८६३ या दिवशी विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी या दांपत्याला पुत्ररत्न झाले . त्यांनी त्याचे नाव नरेन्द्रनाथ ठेवले . नरेन मोठा होऊ लागला . जेव्हा नरेन्द्रनाथ फारच अनावर होई तेव्हा त्याला शांत करण्यासाठी आई त्याच्या डोक्यावरून थंड पाणी ओतून तोंडाने शिव शिव असे म्हणत असे . नरेनला श्रीरामाची कथा फार आवडे . नरेनने रामसीतेची एक मातीची मूर्ती आणली व त्याची तो पूजा करू लागला . नरेनला रामायण प्रिय होते . हनुमंत हा रामभक्त केळीच्या बागेत राहतो , हे समजल्यावर नरेन केळीच्या बागेत जाऊन हनुमंताची वाट पहात असे , ध्यानाचा खेळ नरेनला फार आवडे . आपल्या दोनचार मित्रांसह एकांताच्या जागी जाऊन रामसीतेचे किंवा शिवाच्या मूर्तीच्या समोर तो ध्यान लावत असे . एकदा नरेन ध्यानमग्न असतांना एक नाग तेथे आला . इतर मुलांनी ते पाहिले आणि पळत सुटले . नरेन मात्र तिथेच बसला . कारण नरेनला माहितच नव्हते की आपल्या शेजारी नाग आहे . नंतर नरेनची आई नरेनला विचारते , ” अरे तू पळून का नाही आलास ? अगं , मला काही कळलेच नाही . नाग आलेलाही मला माहित नाही . मी फारच आनंदात होतो . नरेनचे वडील वकील असल्यामुळे त्यांना भेटायला वेगवेगळया जातीचे लोक येत . त्यांच्या स्वागतासाठी हुक्का ठेवत असत . पण वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी वेगवेगळे हुक्के का हा प्रश्न नरेनला पडत असे . एक जात दुसऱ्याच्या हातचे खाऊ शकत नाही . असं का ? सगळयांचे हे हुक्के आपण ओढून पहावे का ? हाय होईल ? मोठा स्फोट होईल का ? छत खाली येईल का ? त्याने हा प्रयोग करायचे ठरवले . पहिला हुक्का ओढला . काहीच झाले नाही . दुसरा हुक्का ओढला . काहीच झाले नाही . तेवढ्यात त्यांचे बाबा आले आणि म्हणाले नरेन काय करतोस ? बाबा जातीचा नियम तोडला तर काय होते ते मी पहात होतो . यावर वडील हसले आणि कामाला निघून गेले . १८८४ च्या सुरुवातीला नरेनचे वडील वारले . त्याला भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागे , तो घरातसगळ्यात थोरला मुलगा असल्याने त्याच्यावरच सर्व जबाबदारी येऊन पडली . वडील पैशाच्या बाबतीत सढळ हाताचे असल्याने शिल्लक काही राहिले नाही . एकदा एका वकिलाच्या हाताखाली काम मिळाले , तर एका शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली . परंतु कायमस्वरूपी काहीच उत्पन्न मिळेना . अडचणीमध्ये राहते घर हाच एक दिलासा होता . पण काही नातेवाईकांनी या घराच्या हिश्यावर कोर्टात दावा लावल्याने तोही आधार जाण्याची वेळ आली . सुदैवाने खटला नरेनच्या बाजूने लागला आणि घर वाचवले . एकदा नरेन्द्रनाथ व गिरीशचंद्र घोष हे दोघे एका झाडाखाली ध्यानाला बसले होते . गिरीशचंद्र घोष हे बंगाली साहित्यातील नावाजलेले नाटककार , कवी व लेखक होते . गिरीशबाबूंनी ध्यान लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला , परंतु ध्यान काही लागेना . नरेन्द्रनाथांना ते जमते आहे का हे पाहण्यासाठी गिरीशबाबूंनी डोळे उघडले . पाहातात तो काय आश्चर्य ! नरेनच्या अंगावर डासांची घोंगडी तयार झाली होती , तरीही तो ध्यानात पूर्णपणे बुडून गेला होता . एका वेगळ्या आणि निर्मळ आनंदात ते मग्न झाले . या अवस्थेला समाधी म्हणतात . एके दिवशी श्रीरामकृष्णांनी आपल्या तरुण शिष्यांना संन्याशाप्रमाणे भिक्षा मागण्यास पाठवले . १६ ऑगस्ट , १८८६ या दिवशी आपल्या सर्व शिष्यांना सोडून गेले . या नंतर काही शिष्य घरी परतले आणि त्यांनी राहिलेले शिक्षण पुन्हा सुरू केले . नरेंद्र मात्र या पांगलेल्या शिष्यांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्ल करू लागला . स्वामीजी शिकागोला पाहोचले . एका दैवी उद्दिष्टासाठी या देशात पाठवले असेल तर आता तोच आपली काळजी घेईल , असा विचार करून ते पुढे जे काय होईल त्याची वाट पाहात रस्त्याच्या कडेला बसून राहिले , थोडयाच वेळात समोरच्या एका घराचे दार उघडले गेले आणि एक स्त्री बाहेर आली . स्वामी समोर जाऊन ती म्हणाली , “ आपण सर्वधर्म परिषदेचे प्रतिनिधी आहात का.स्वामीजींनी तिला आपली सर्व हकीगत सांगितली . आणि स्वामीजींना नास्ता दिला . त्यांना सर्वधर्मपरिषदेच्या कार्यालयात घेऊन गेली . सर्व कागदपत्रे दाखवली आणि त्यांना प्रतिनिधी म्हणून आनंदान मान्यता मिळाली . ही सारी मदत करण्याच्या स्त्रीचे नाव होते श्रीमती जॉर्ज हेल . ती व तिचे पती व तिची मुले सर्वजण स्वामिजींचे स्नेही होऊन गेले . सर्वधर्मपरिषदेत स्वामिजींनी अनेक भाषणे दिली . निबंध वाचले . परंतु हिंदूधर्म हा त्यांचा निबंध सवात लोकप्रिय ठरला . श्रोत्यांना शेवटपर्यंत थांबवावे लागून त्यांचे व्याख्यान शेवटी ठेवत असत . स्वामीजी मात्र आपल्या गरीब देशबांधवांना अजिबात विसरले नाहीत . त्यांना कोणत्या उपायांनी मदत करता येईल याच गोष्टीचा ते सतत विचार करीत . सप्टेंबर , १८ ९ ५ मध्ये स्वामिजींनी इंग्लंडला भेट दिल्याचे आपण पाहिले . त्यांचे स्नेही श्री . इ.टी. स्टी आणि सौ . हेब्रेटा न्यवर यांनी त्यांचे स्वागत केले . लंडनला येताच यांनी परत वेदान्ताचे वर्गघेण्यास आरंभ केला . पहिल्यापेक्षाही हे वर्ग यावेळी अधिक यशस्वी झाले . प्रथम कोलंबो ते मद्रास हा प्रवास बोटीने करावा असे ठरले होते . परंतु वाटेतल्या गावांकडून स्वामिजींनी स्टेशनवर पाच मिनिटे तेथे थांबून दर्शन घ्यावे अशा विनंतीवर सारांचा त्यांच्यावर अक्षरशः पाऊस पडला . फेब्रुवारी ते मे या दिवसांत स्वामीजी कोलकत्याला राहिले . त्यांना भेटण्यास व चर्चा करण्यास असंख्य लोक येत . अविवाहित तरुण लोकांना ते आवर्जून भेटत , त्यांना प्राण्यांची फार आवड होती . मठात त्यावेळी बरेच प्राणी होते . प्रा . मॅक्समुलरनी रामकृष्णांवर असाच एक लेख लिहिला होता , त्यांना रामकृष्णांविषयी आणखीही काही माहिती हवी होती . स्वामिर्जीनी स्वामी सारदानंदांना या संदर्भात मदत करायला सांगितले . १५ जानेवारी , १८ ९ ६ रोजी स्वामिर्जीचे जहाज कोलंबोच्या किनाऱ्याला लागले . स्वामीजी अत्यंत आनंदात आणि उत्साहात होते .

Leave a Reply

Your email address will not be published.